📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अंधश्रद्धेचा कळस : यांनी तर कोरोना चे मंदिरच बांधून टाकले

मालेगाव (जय योगेश पगारे ) भारतीय लोक कधी काय करतील याचा नेम नाही , आणि अशातच एखादी गोष्ट जर देवांशी निगडीत असेल तर तिथे जास्त कोणी बोलत नाही असेच एका गावातील  ग्रामस्थांनी चक्क "देवी कोरोना" म्हणून सरळ  मंदिरच  उभारले आहे आणि दैवी हस्तक्षेपामुळे प्राणघातक विषाणूचा नाश होईल या आशेने ते प्रार्थना करीत आहेत.

उत्तर प्रदेशातील शुक्लपूर गावात भाविकांनी या आठवड्यात एक मंदिर बांधून टाकले आणि त्यांनी “कोरोना मातेला ” केवळ पिवळ्या रंगाचे फुले, प्रसाद, मिठाई, घंटा अर्पण केली जात आहेत, दर्शनासाठी हाथ पाय धुवून, मास्क लावून, यावे असे सांगत आहेत एवढच नाही तर जगातील एकमेव मंदिर असल्याचे ते गर्वाने सांगत फिरत आहेत 

कोरोना देवीच्या कृपेने  गावकरी, गाव आणि इतर सर्वांना थोडा आराम मिळेल," असे संगीता नावाच्या महिलेने  शुक्रवारी सांगितले.





एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या तीव्रतेने भारताला मोठा फटका बसला परंतु त्याचे दूरगामी  दुष्परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने