📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कोरोनामुळे निधन झालेल्या पालकांच्या मुलांचे 11 वी, 12 वी सायन्स चे क्लासेस मोफत तसेच शैक्षणिक साहित्य ही पुरवणार : प्रा. अंकुश मयाचार्य

मालेगाव (जय योगेश पगारे ) मालेगाव  शहरासह तालुक्यात अनेक निष्पाप लोकांचा नाहक बळी गेला आहे, अनेक विद्यार्थ्यांचे पालक जग सोडून गेल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची आबळ होऊ नये यासाठी अनेक दानशूर शिक्षणप्रेमी पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत, मालेगाव कोचिंग कलासेस असोसिएशन चे अध्यक्ष अंकुश मयाचार्य यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती  घेतलाय ज्याबाबत  बोलतांना ते म्हणाले की कोरोनाच्या ह्या कठीण काळातून आता आपण बाहेर पडायला सुरुवात केली आहे आणि एक सुखद अशी पहाट होण्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघतोय,परंतु आपल्या सभोवताली असे सुद्धा कुटुंब आहेत ज्यांच्या जीवनात ह्या कोरोनामुळे संपूर्ण अंधःकार साचला आहे.
ह्या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले, दुर्देवाने काही घरातील कर्ते स्त्री-पुरुष अकाली सोडून गेल्याने अनेक पाल्य पोरके झालेत आणि आता यापुढे कदाचित त्यांची पुढील शिक्षणाची परवड होऊ शकते,त्यांच्या दुःखाच्या ह्या काळात आमच्या संवेदना त्यांच्यासोबत आहेतच मात्र त्याचसोबत ह्या विद्यार्थ्यांना माणुसकीच्या दृष्टीने काहीतरी मदत देणं हे आपलं कर्तव्य आहे.अश्या विद्यार्थ्यांसाठी दत्तप्रसाद क्लासेस मदतीचा एक खारीचा वाटा उचलू इच्छिते.
ह्या कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे दुर्देवी निधन झाले आहे,अश्या सर्व 11वी-12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना दत्तप्रसाद क्लासेसमध्ये मोफत शिकवणी दिली जाईल व सोबतच त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य सुद्धा पुरवले जाईल.

जर आपल्या संपर्कात असे विद्यार्थी असतील त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन  अंकुश मयाचार्य सर, संचालक : दत्तप्रसाद क्लासेस  
9271592281 7972478358 यांनी केले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने