चेन्नई येथील प्राणी संग्रहालयातील एका सिंहीनीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली, गेल्या गुरुवारपासून सदर सिंहीनी वर उपचार सुरु होते, इतर सिंहांचे टेस्ट पॉझिटिव्ह असून ते असिम्प्तोमॅटिक (लक्षणे नसलेले)आहेत, त्या सर्वांना लक्ष ठेवण्यात आले असून त्यांना विलगीकरनात ठेऊन अँटिबायोटिक्स देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सिंहांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, त्यापैकी सफारी पार्कच्या अलीमल हाऊस १ मध्ये ठेवलेल्या पाच सिंहांमध्ये भूक न लागणे आणि कधीकधी खोकल्याची लक्षणे आढळली आहेत.
सार्स कोव्ही -२ पॉझिटिव्ह आढळलेल्या सिंहावर पशुवैद्यकीय पथकासह तमिळनाडू पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या टीमने उपचार केले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही दुसर्या सिंहाचे नमुने आणि सर्व वाघांचे नमुने चाचणीसाठी पाठवू फक्त एका गर्भवती सिंहिनीचा नमुना चाचणीसाठी पाठवता येणार नाही कारण बेशुध्द करण्याच्या (भुल देणे ) प्रक्रियेमुळे तिची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
यापूर्वी मे महिन्यात हैदराबादमधील प्राणीसंग्रहालयातील आठ आशियाई सिंहांना Sars असल्याचे आढळले होते. CoV2 च्या संपर्कात आल्यामुळे त्याला श्वसनाच्या समस्येचा सामना करावा लागला.