📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सोमवार पासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉक

राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.
ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल. 

 
🔸दोन दिवसापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

🔸अखेर राज्य सरकारने काल रात्री उशिरा भलामोठा शासन आदेश जारी करून लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

🔸राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यावरुन झालेला गोंधळ आता निस्तरला गेला आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये येत्या सोमवारपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचा आदेश राज्याचे मुख्य सचीव सीताराम कुंटे यांनी मध्यरात्रीनंतर काढला आहे. 

🔸राज्याच्या प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या पाॅझिटिव्हीटी रेट प्रमाणे हे निर्बंध शिथिल केले जातील किंवा वाढवले जातील.
 

🔸शासनाच्या आदेशानुसार आता मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, , पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,औरंगाबाद , सोलापूर आणि नागपूर महापालिकांचे स्वतंत्र युनिट असेल. 

🔸तेथिल महापालिका प्रशासनाला आपल्या भागासाठी वेगळी नियमावली काढण्याची मुभा आहे. 

🔸ज्या ठिकाणी कोरोना पाॅझिटिव्हीचा दर रेट हा ५ टक्क्यांपेक्षा आहे आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट व  ऑक्सिजन बेड यानुसार पाच गट करण्यात आले आहे.

💠 *पहिला गट -* 

➖ , औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे. 

👆🏻या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काही सेवांवरील निर्बंध वगळता पूर्णतः रद्द करण्यात आलेला आहे. 

💠 *दुसरा गट* 

➖मुंबई शहर. यात लोकल आणि बससेवा वगळता सर्व (माॅल, रेस्टाॅरंटसह) खुले होईल. नगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार हे जिल्हेही याच गटात आहेत.

🔸 *काय सुरु राहणार-* 

- रेस्टाॅरंट ५० टक्के क्षमतेने
- मॉल्स आणि सिनेमगृह ५० टक्के क्षमतेने
- सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्णतः सुरु
- सर्व प्रकारची बांधकामे सुरु
- शेतीविषयक कामे पूर्ण क्षमतेने
- ई सेवा पूर्ण क्षमतेने
- जिम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने

💠 *तिसरा गट* 

➖ नाशिक, अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे

🔸 *काय सुरु- काय बंद* 

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत व अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू (अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवारी बंद)
- मॉल्स आणि सिनेमागृह बंद
- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली (दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू) शनिवार आणि रविवार पूर्ण बंद
- सकाळी 5 ते 9 यावेळेत सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सुरू
- खासगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीत
- इनडोअर खेळ पूर्ण बंद
- सिनेमा चित्रीकरण फक्त स्टुडिओमध्येच
- सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजेपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीने परवानगी
-लग्न सोहळे ५० जण, अंत्यसंस्काराला २० जणांना परवानगी
- शेतीविषयक कामे आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामे दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार
- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी 

💠 *चौथा गट* 

➖पुणे व पिंपरी चिंचवड वगळता पुणे आणि राजगड जिल्हा

🔸 *काय बंद काय सुरु -* 

- सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेतील दुकानांना स. ७ ते दु. २ पर्यंत परवानगी
- इतर दुकानं पुर्ण वेळ बंद
- सिनेमागृह, मॉल बंद
- हॉटेलमधील फक्त पार्सलला परवानगी
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ या वेळात सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक यांना परवानगी
- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालये २५ टक्के उपस्थितीने सुरु
- शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थिती
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ या वेळात आउट डोअर स्पोर्टस्ला
- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
- लग्न सोहळ्यासाठी २४ व अंत्यसंस्कारसाठी २० जणांना परवानगी
- राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के क्षमतेने
- कामगारांच्या राहण्याची सोय असेल्या ठिकाणची बांधकामे सुरु राहणार
- शेती विषयक कामांना सोमवार तेे शुक्रवार दुपारी २ पर्यंत परवानगी
- अत्यावश्यक सेवेसाठी ई काॅमर्स सुरू राहील
- सलून आणि जीम एसी बंद ठेऊन ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
- बसेस ५० टक्के क्षमतेने. फक्त बसण्याची व्यवस्था
- संचारबंदीचे नियम कायम

💠 *पाचवा गट* 

 वर नमूद केलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य जिल्हे



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने