📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव व परिसरात जोरदार पावसाची हजेरी

मालेगाव ( जययोगेश पगारे  ) मालेगाव शहरासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली असून दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता, तज्ज्ञांच्या मते या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्या अनुषंगाने या पावसा चे स्वरूप बघता पुढेही अशा प्रकार चे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 निसर्गाच कोणी मालक नसतो, त्यामुळे कधी वातावरण कशा प्रकारे बदलेल याचा नेम नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, कच्चा, पत्र्याच्या  राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी आपल्या घराची डागडुजी करणे गरजेचे आहे, घराजवळ झाडे असल्यास त्याच्या कमजोर झालेल्या फांद्या सोडून सुरक्षेची हमी करून घ्यावी, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल भिजणार  नाही अशा प्रकारे नियोजन करून  ठेवावे जेणेकरून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते परंतु जेवढे नुकसान झाले तेवढे मिळत नसते त्यामुळे आपले नियोजन आपले प्रचंड नुकसान टळू शकते.
पावसामुळे बिळात पाणी जाऊन, विषारी बिनविषारी साप, विंचू वा इतर सरपटणारे जीव आपला जीव वाचवण्यासाठी जमिनीवर येतात व शेतातील घरात अथवा काट्या-कुट्या जवळील घरांमध्ये असे जीव पावसाळ्यात हमखास आढळतात, त्यामुळे या बाबतीतही नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, भारतात मोठ्या प्रमाणात सापाच्या प्रजाती आढळतात त्यापैकी काही निवडक जाती ह्या विषारी असतात काही वेळा बिनविषारी सर्पदंशाने केवळ भीतीपोटी माणूस जीव गमावून बसतो अशावेळी घाबरून न  जाता लवकरात लवकर जवळील सर्पमित्राला पाचारण करावे, परंतु सापाबद्दल माहिती नसल्यास सापाला मारणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये याने तसेच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 
रात्री-अपरात्री अशा प्रकारे कोणताही जीव निघाल्यास सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवावे जेणेकरून त्याला लवकर पकडण्यास मदत होते.
मालेगाव लाईव्ह तर्फे आपण लवकरच सापांवर आधारित एक एपिसोड घेऊन येणार आहोत,  जनमानसामध्ये सापांबद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे त्यामूळे दोघांचा जीव वाचण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने