📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावमधील सिक्ससिग्मा आणि सनराईज या दोन रुग्णालयांवर फसवणूक आणि सरकारी संस्थेचे आर्थिक करणे प्रकरणी गुन्हा दाखल

मालेगाव मधील सिक्स सिग्मा आणि सनराईज या दोन रुग्णालयांवर फसवणूक आणि सरकारी संस्थेचे आर्थिक करणे या कलमानुसार मालेगाव महानगरपालिकेने छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात या दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याचे सतत आरोप होत होते. त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांची बिले तपासण्याचे काम करण्यात आले. याच दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे मालेगाव मधील एका रुग्णाने तक्रार केल्यानंतर त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन छापा टाकला आणि रुग्णालय प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी केली होती. या प्रकरणी त्यांनी जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्यासंदर्भात सांगितले होते. जर दोन्ही रुग्णालयांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा भुसेंनी दिला होता.
काल (दि. 8) मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलीस स्टेशन गाठून सिक्ससिगमा आणि सनराइज् या दोन हॉस्पिटल विरुद्ध तक्रार दिली आहे. या दोन्ही रुग्णालयांनी महानगरपालिकेकडे जी कागदपत्रे सादर केली आहेत त्यामध्ये महानगर पालिकेचा अग्निशमन प्रतिबंधक परवाना एकाच रुग्णालयासाठी घेतला होता आणि तोच दोन्ही ठिकाणी दाखवण्यात आले. तसेच या रुग्णालयांनी भाडे करारनामा केला आहे त्यामध्ये देखील विसंगती असल्याचे समोर आले असून या दोन्ही रुग्णालयांनी मिळून मालेगाव महानगरपालिकेचे सुमारे 2 लाख 30 हजार 256) रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. या दोन्ही रुग्णालयाचे मॅनेजमेंट पाहणारे रमणलाल सुराणा यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यामध्ये मालेगाव महानगर पालिकेच्या उपायुक्तांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भा. दं. वि कलम 420, 465, 468, 471 व महानगरपालिका अधिनियम 393 / 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वाडीले करीत आहे.

साभार: भ्रमर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने