मालेगाव महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. हेमंत गढरी यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याचे प्रकरण चर्चेत असल्याने शिवसेना नेते सुनील देवरे यांनी डॉ. सपना ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी केली होती, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढून डॉ. ठाकरे यांचा पदभार डॉ. हेमंत गढरी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आयुक्त गोसावी यांनी दिली