📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सावधान: मालेगाव शहरात पुन्हा एका जिवघेण्या आजाराची साथ!

मालेगाव (जय योगेश पगारे - कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क) शहरात आता एका नव्या आजाराने  थैमान घालण्यास सुरूवात केली आहे, या रोगात पाण्यासारखे जुलाब, उलटया होतात. उपचार झाले नाहीत तर रोगी दगावण्याची शक्यता खूप असते

गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना अतिसारसारखे आजाराची लक्षणे जाणवत होती त्यामुळे या आजाराचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यानुसार हा आजार कॉलरा (पटकी) असल्याचे निष्पन्न झाले
या परिस्थितीत नागरिकांनी पाणी  गाळून उकळून गार करून पिणे हा एकमेव चांगला पर्याय आहे, 
माझे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाले आहे त्यांच्या सूचनेनुसार मालेगावातील महापालिका व सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध पाण्याचा व्हावा यासाठी त्यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत - आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल

हा रोग सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हे जंतू रुग्णाच्या उलटीतून, जुलाबातून पाण्यामार्फत,अन्नामार्फत, प्रत्यक्ष संपर्काने किंवा माशीच्या पायांनी पसरतात. शरीरात प्रवेश झाल्यानंतर जंतू दोन - तीन तासांत पचनसंस्थेवर ताबा मिळवतात. त्यामुळे पचनसंस्थेत मोठया प्रमाणावर पाणी पाझरते. हे पाणी उलटी, जुलाबाद्वारे बाहेर टाकले जाते. पाणी बाहेर पडल्यामुळे शरीरातले पाणी आटून शोष पडतो व रक्तपुरवठा कमी होतो. नाडी मात्र वेगाने चालते. योग्य वेळी शरीराला क्षार-पाण्याचा पुरेसा पुरवठा न झाल्यास मृत्यू येऊ शकतो.
पुरेसे व स्वच्छ पाणी हाच पटकीविरुध्दचा खरा प्रतिबंधक उपाय आहे. पटकीच्या लसीचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळे ही लस देणे आता बंद झाले आहे
रुग्णाच्या जुलाबाचा नमुना बाटलीत/प्लास्टिक पिशवीत जमा करून आरोग्य प्रयोगशाळेत पाठवला जातो

🛑 रोगनिदान व लक्षणे
कधीकधी यात केवळ पाण्यासारखी उलटी किंवा नुसते जुलाब होऊ शकतात. तहान, उलटी, जुलाब (पाण्यासारखे) हे सुरुवातीचे चित्र असते. काही वेळानंतर पायात पेटके (वांब ) येणे, लघवी बंद होणे, ग्लानी येणे, इत्यादी लक्षणे दिसतात. रुग्ण अतिशोषामुळे बेशुध्द होऊ शकतो.
चिन्हे : 
जीभ कोरडी दिसते, डोळे खोल व निस्तेज दिसतात. पोटावरची किंवा पायावरची कातडी चिमटीत धरून सोडल्यास सुरकुती राहते आणि हळूहळू नाहीशी होते. निरोगी अवस्थेत अशी सुरकुती लगेच नाहीशी होते. (उतारवयात ही खूण उपयोगी नाही कारण कातडीला सैलपणा असल्याने आपोआप सुरकुत्या पडतात.) सौम्य पटकीचा आजार केवळ अतिसारासारखा असतो.

🛑 उपचार
या रुग्णास हॉस्पिटलमध्ये पाठवणे जरुरी असते. पण प्रथमोपचार त्वरित सुरु करावा. प्रथम रोग्याला घरगुती सलाईन जीवनजल (मीठ, साखर मिसळलेले पाणी) पाजा. त्याला हवे तितके जीवनजल पिऊ द्या व पीत नसल्यास आग्रहाने पाजा. उलटी होत असली तरी तोंडावाटे थोडेथोडे जीवनजल देतच रहा. यामुळे शोष आटोक्यात राहील. यासाठी खालीलप्रमाणे घरगुती सलाईन तयार करावे. घरगुती सलाईन द्या- एक लिटर स्वच्छ पाण्यात - 1 मूठ साखर, 2 चिमूट मीठ आणि 1 चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळा. हे जीवनजल म्हणजे घरगुती सलाईनच असते. हे दिल्याने बहुतेक रुग्ण वाचू शकतात. शिरेतून दिल्या जाणा-या सलाईनच्या इंजेक्शनपेक्षा जीवनजल खूपच स्वस्त आहे. याऐवजी नारळाचे पाणी, चहा,कॉफी, सरबत,पेज हेही चालेल. प्रकृती गंभीर असली तरी सलाईन मिळेपर्यंत जीवनजल चालूच ठेवा. 

जीवनजल किती पाजायचे? 
जिभेवरचा व कातडीवरचा कोरडेपणा पूर्णपणे जाईपर्यंत पाजत राहावे. मग त्याची लघवी परत चालू होईल. बंद पडलेली लघवी परत चालू होणे याचा अर्थ आता शरीरात पुरेसे पाणी आहे.
कॉलरा जंतूंवर टेट्राच्या औषधाचा चांगला गुण आहे. मात्र लहान मुलांना फ्युराडिन किंवा ऍंपीसिलीनच्या गोळया द्याव्यात.

महापालिका, प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा आरोग्य कर्मचा-याला कळवा. ते येऊन पाणी तपासतील पाहणी करतील. पाण्यात क्लोरिन/ब्लिचिंग पावडर औषध टाकतील. पाणीशुध्दीकरण तुम्हीही करू शकाल.) रुग्णास सलाईन लावून आरोग्यकेंद्रात नेतील.
आजा-याच्या उलटीने, जुलाबाने दूषित झालेली जमीन, कपडे, वस्तू, इत्यादी फिनेलने धुवून घ्या. नाहीतर जंतूंची लागण इतरांनाही होईल. जुलाब, उलटी पाण्यापासून लांब जागी खड्डयात गाडून टाका.

 पाणी घरी आणल्यानंतर घागरीत, हंडयात औषध टाका. शक्यतो दूषित पाणी वापरण्याऐवजी नळाचे पाणी वापरा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने