मुंबई (कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क) 1992 चा हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी दोन दिवसांपूर्वी आणखी एक घोटाळा झाल्याचे म्हटले होते.
त्यांच्या या नव्या एका ट्विटमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. आज मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सुचेता दलाल यांनी काय घोटाळा झाला याबाबत स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र अदानी समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या तीन FPI ची खाती गोठवल्यानं त्यांचे शेअर्स कोसळले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे.
आणखी एक घोटाळा असा झाला आहे की तो उघडकीस येणे कठीण आहे, सेबी च्या ट्रॅकिंग यंत्रणेच्या बाहेर असून एक समुहामध्ये मोठा घोटाळा फेरफार सुरू आहे, यासाठी परदेशातील कंपन्यांची मदत घेतली जात आहे, आणि अजून कोणाला कळेल अस काही बदल झाला नाही.
Tags
share market