देवळा (मनोहर शेवाळे) हृदय पिळवटून टाकणारी घटना आज
सोमवारी (दि.१४) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे, माता पित्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही अत्यंत वेदनादायक घटना देवळा तालुक्यातील वासोळ येथे घडली आहे.
नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला कपड्यांमध्ये गुंडाळून फेकून देण्याच्या संतापजनक प्रकार घडला आहे.
वासोळ गावातील आदिवासी वस्तीत पडक्या झोपडीजवळ नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक कपड्यांमध्ये गुंडाळलेले आढलुन आले भटक्या कुत्र्यांनी बाळाच्या पायाचे लचके तोडल्यामुळे असह्य वेदनेमुळे बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे नागरिकांचे लक्ष गेले, तातडीने अभ्रकाला उपचारासाठी वासोळ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात हलविण्यात आले, अर्भकावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला पंजाला गंभीर इजा झाली असून अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्री जातीचे अभ्रक असल्याने सदर घटना ही पुत्रप्राप्ती मोहातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.
अत्यंत नीच पातळीवर जाऊन अशा प्रकारचे विकृत कृत्य करणाऱ्यांना त्वरित शोधून अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व नागरिक करीत आहेत.