मुंबई (जय योगेश पगारे) .घाटकोपरच्या कामा लेनच्या त्रिभुवन मिठाईवाला या दुकाना मागील रामनिवास सोसायटीतील विहीर कित्येक वर्षापूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करून अर्धी विहीर झाली होती. इथे पार्कींगसाठी जागा मोकळी सोडण्यात आली होती. पावसामुळे आरसीसी खचले आणि रहिवासी पंकज मेहता यांनी पार्क केलेली कार विहीरीत बुडाली, ही घटना घाटकोपर मधील पश्चिमच्या राम निवास सोसायटीची आहे. या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
कारची आत्महत्या – सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. फेसबुक वर बरेच जणांनी खूप मजेशीर ट्रोल करत व्हिडिओ शेयर केला आहे. काहीने म्हंटले “पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने कार ने आत्महत्या केली” तर काहीने कारची जलसमाधी’ त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
एका इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केलेली कार जागच्या जागी जमीन खचून खाली असलेल्या पाण्यात बुडत असतानाचा एक व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई मनपानं देखील संबंधित घटनेची सविस्तर माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच या घटनेशी महानगरपालिकेचा काडीमात्र संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
जुन्या काँक्रिट केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करत होते. पाहू शकता किती खोल विहीर आहे. RCC बांधकाम केले होते परंतु ते जुने व जीर्ण झाले तसेच जास्तीचा पाऊस झाल्याने विहीरीचे बांधकाम पडले. व ही घटना घडली.
Scary visuals from Mumbai's Ghatkoper area where a car drowned in few seconds. pic.twitter.com/BFlqcaKQBo
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 13, 2021
नंतर पाणी उपसून कार क्रेन द्वारे विहिरी बाहेर काढण्यात आली