📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

fact check: इंडिया ऐवजी भारताचे भारत असे नामकरण?

व्हॉट्सऍप सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल केली जात आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारताचे इंडिया असे नाव सर्व शासकीय प्रक्रियेतून वगळून भारत असे केले आहे.
याबाबत मालेगाव लाईव्ह फॅक्ट चेक च्या माध्यमातून केलेल्या पडताळणीत पुढील निष्कर्ष हाती आला आहे, 
संविधानाच्या आर्टिकल 1 मध्ये सुधारणा करून इंडिया एवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा अशी याचिका मागच्या वर्षी एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती
याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की संविधानात आधीच भारत हा शब्द देशासाठी उल्लेख केलेला आहे त्यामुळे पुन्हा त्यात सुधारणा करण्याची कुठलीही गरज नाही.
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फिरत असणारा मेसेज हा खोटा आहे, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडिया म्हणून ओळखले जाते, त्यामुळे भारतात बरेच भारतीय भारताला भारत असे म्हणूनच संबोधतात, आणि बऱ्याच शासकीय व्यवहारांमध्ये सुद्धा 'भारत सरकार' असेच लिहिले जाते, त्यामुळे 15 जून रोजी इंडिया चे नामकरण होऊन भारत असे झाले असा मेसेज खोटा आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याने तो पुढे फॉरवर्ड करू नये!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने