मालेगावच्या पाटणे विद्यालयाचा जिल्ह्यात डंका ; विजयाची परंपरा कायम, जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत पुन्हा प्रथम क्रमांक

अक्षर:
मालेगाव नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मालेगाव तालुक्याने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने दणदणीत विजय मिळवत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला आहे.
विजयाची यशोगाथा सुरूच... यंदाही मालेगाव संघच विजयी झाला असून, गेल्या वर्षीच्या विजयाची परंपरा आणि यशोगाथा या संघाने अशीच कायम ठेवली आहे. सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम येऊन या संघाने आपणच खरे चॅम्पियन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील बलाढ्य संघ सहभागी झाले होते. पाटणे संघाने  दिंडोरी, त्र्यंबकेश्वर सारख्या तुल्यबळ संघांचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना मालेगाव विरुद्ध सुरगाणा असा रंगला होता. या सामन्यात पाटणे संघाने उत्कृष्ट चपळाई आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करत ८ गुण व एक डाव राखून सुरगाणा संघावर दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्व सामने एकतर्फी जिंकत या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
या ऐतिहासिक यशामागे क्रीडाशिक्षक राकेश खैरनार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांना अमोल पवार, नंदलाल खैरनार आणि दिनेश बागले,दिगंबर तांबे यांचे सहकार्य लाभले.
या दैदिप्यमान यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन दौलत बागुल, विद्यालयाचे मुख्याध्यापक घोंगडे सर, पर्यवेक्षक बागुल सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पाटणे ग्रामस्थांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया

बातमी द्या