📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पैशांच्या वादात मित्राचाच खून; केला अपघाताचा बनाव Tv51, TV 51, Tv 51 NEWS, Nandgaon Murder friends

0
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात दोन मित्रांनी पैशाच्या वादातून आपल्या मित्राचा खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक रमेश कदम (वय ३२) हा साकोरा गावात राहणारा होता. त्याचे दोन मित्र योगेश बाळू पगार  आणि दीपक बोरसे  हे आहेत. दीपक कदम आणि योगेश पगार यांच्यात पैशाचा वाद होता. या वादातून योगेश पगार आणि दीपक बोरसे यांनी दीपक कदम याचा खून केला.

दोघांनी दीपक कदम याला तमाशा बघायला जायचे म्हणून घेऊन गेले. त्यानंतर लोखंडी रॉडने त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला महामार्गावर टाकून अपघात झाल्याचा बनाव केला.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास कामी पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांना सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा फिरवली आणि अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने साकोरा गावात खळबळ उडाली आहे. मागेही न्यायडोंगरी येथील डॉक्टर कुटुंबातील सासरा आणि पतीने आपल्या डॉक्टर पत्नीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव केला होता. मात्र तेव्हाही पोलिसांनी तात्काळ या घटनेचा पर्दाफाश केला होता. आजही या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या आणि आरोपींना जेरबंद करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)