📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

संतापजनक: सोयगावात भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके; महिला गंभीर जखमी

0
सोयगाव परीसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. नेहमीच  हे कुत्रे लहान मुले, वृद्ध व्यक्ती व वाहन धरकांवर धावून जातात, ताजी घटना म्हणजे, एका वृद्ध महिलेवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिचे लचके तोडले.

या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव सरस्वती संपत सूर्यवंशी आहे. त्या सोयगावातील इंदिरानगर भागात राहतात. त्या नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले असता तेव्हा भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी अक्षरश : त्यांच्या हाताचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले, या हल्ल्यात ते रस्त्यावर पडताना त्यांनी हाताने आपले डोके वाचवले अन्यथा या काँक्रीट रस्त्यावर डोके आदळल्याने मोठा अनर्थ घडला असता,  परिसरातील नागरिकांनी धावून आल्याने कुत्रे पळून गेले.

जखमी महिलेला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सोयगावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोयगावातील मराठी शाळा ते राजमाता जिजाऊ उद्यानापर्यंतचा रस्ता हा खूप वर्दळीचा असून याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक व विद्यार्थी येजा करीत असतात, विद्यार्थ्यांना ने आन करण्यासाठी बऱ्याच वेळा घरातील ज्येष्ठ नागरिक या रस्त्याने वावरत असतात, त्यामुळे अनेकदा असे प्रकार घडले आहेत, अनेक वेळा हे भटके कुत्रे धावून जाऊन अपघात देखील घडले आहेत,  याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे

या संदर्भात टीव्ही 51 ने प्रमुख स्वच्छता निरीक्षक इकबाल मोहम्मद जान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)