📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ढिसाळ कारभारामुळे नागरीक त्रस्त; सरपंच व ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे


**चंदनपुरी वीज उपकेंद्राला ग्रामस्थांनी लावले टाळे; लेखी हमी मिळाल्यावर आंदोलन मागे**

 श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असून त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राच्या कार्यालयालाच काळे ठोकत आपला संताप व्यक्त केला..

ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या होत्या, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने शेवटी संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयालाच टाळे लावले.

चंदनपुरी भारतातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी येथे खंडोबाची मोठी यात्रा भरते दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येतही वाढ होत आहे, त्यामुळे गावात गर्दीचे प्रमाण वाढत आहे, गावात अनेक ठिकाणी वीज खांब रस्त्यावरच आहेत. अनेक वीज तार तुटलेली आहेत. त्यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. येत्या पंचवीस तारखेला चंदनपुरी येथे खंडोबाची मोठी यात्रा भरणार आहे. हे सर्व खांब मिरवणूक मार्गात येत असल्यामुळे अडथळे निर्माण होत असतात.

या सर्व समस्यांवर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला तक्रारी केल्या होत्या. मात्र, कंपनीने त्यावर कोणतीही पावले उचलली नाहीत यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वीज उपकेंद्राला टाळे लावले.

या आंदोलनाची दखल घेत वीज वितरण कंपनीने ग्रामस्थांना लेखी हमी दिली आहे. त्यानुसार, पंचवीस तारखेला सुरू होणाऱ्या यात्रेच्या आधी सर्व वीज खांब रस्त्यावरून हटवले जातील. तसेच, वीज तारांची देखभाल करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.

या हमीवर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने