देवळा, ८ जानेवारी २०२४ (प्रतिनिधि) - देवळा पोलिस स्टेशनच्या वतीने आज, सोमवार, ८ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवळा तालुक्यातील पत्रकारांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन शेवाळकर यांनी भूषवले. यावेळी देवळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक कचरे, व जेष्ठ पत्रकार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी देवळा तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने पोलिस निरीक्षक दिपक पाटील साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.
देवळा तालुका निर्मिती नंतर पहिल्यांदाच पोलिस निरीक्षक यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे पत्रकार बांधवांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी सांगितले की, पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ आहेत. ते समाजात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा वस्तुनिष्ठपणे मागोवा घेतात. पत्रकारांच्या माध्यमातूनच समाजातील विविध समस्यांना वाचा फोडता येते.
त्यांनी पुढे सांगितले की, देवळा तालुक्यातील पत्रकार बांधव हे नेहमीच पोलीस प्रशासनाला सहकार्य करतात. पोलिस प्रशासनाच्या कामाचा प्रचार-प्रसार करतात. यासाठी मी सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो.
यावेळी पत्रकार बांधवांनी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या सत्काराबद्दल आनंद व्यक्त केला.
वेळी अविनाश महाजन, निकम सर , रौंदळ सर , खंडू मोरे सर , यांनी आपले मनोगत व्यक्त केले.