📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे श्री राम अक्षदा कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात

देवळा (गणेश आढाव) 18 जानेवारी 2024 - देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे श्री राम अक्षदा कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हभप. ज्ञानेश्वर महाराज, हभप बापु संपत आहिरे , हभप आनंदा उखा बच्छाव तसेच स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अभिमन बापु अहिरे, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती श्री. सुकदेव आण्णा अहिरे,नानाजी अहिरे , अमृत जोंधळे, देवपूरपाडे ग्रामपंचायत उपसरपंच शिवाजी आप्पा आहिरे, युवा नेते अजय अभिमान अहिरे, निंबा जोंधळे भास्कर ठाकरे,नथु देवरे, दगडू चिंधा अहिरे, गावातील महिला व ग्रामस्थ, युवा मित्र मंडळ, ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी,जि. प . प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन तंटामुक्ती अध्यक्ष श्री. चंद्रभान ग्यानदेव अहिरे , प्रशांत नानाजी जोंधळे, समाधान निंबा जोंधळे, हर्षद सुर्यवंशी,नयन अहिरे, बाळू बाबुराव अहिरे, खंडेराव आढाव, व युवकांनी केले. कार्यक्रमाची सांगता सौ. सुनंदा चंद्रभान आहिरे व श्री चंद्रभान अहिरे यांच्या हस्ते प्रभु रामचंद्र यांची आरती करून करण्यात आली.

कार्यक्रमातून प्रभु रामचंद्राच्या जीवनातील आदर्शांची शिकवण दिली गेली. तसेच, समाजात शांतता, प्रेम आणि सलोखा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने