📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सुरगाणा येथील शिक्षकाला महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचा राज्यस्तरीय पुरस्कार

सुरगाणा, (गणेश आढाव) दि. 18 जानेवारी 2024: महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023/24 धैर्यशील राव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव, तालुका सुरगाणा येथील इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक श्री निकम एस के सर यांना जाहीर झाला.

श्री निकम सर यांनी विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली एन एम एम एस परीक्षा, एनटीएस परीक्षा इत्यादी परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेऊन शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

श्री निकम सर यांचे पंचक्रोशीतील सर्व शिक्षक मित्र, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने