पांढरुण दिनांक. 17 जानेवारी 2024 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पांढरुण ता. मालेगाव येथे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना वृषभ रथावर आरूढ होऊन मिरवणुकी द्वारे क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा विज्ञान नगरीत प्रदर्शन स्थळी आगमन झाले, पारंपरिक आदिवासी पद्धतीनुसार वेशभूषा, लेझीम पथक, तसेच संबळ संगितावर सुंदर नृत्य करून विशाल नरवाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण आयोजित शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील दुसरे प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन व पारितोषीक वितरण समारंभ पार पडला. या विज्ञान प्रदर्शनात शासकिय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांचे उच्च प्राथमिक आणि माध्य.- उच्च माध्यमिक अशा दोन गटात एकुण 243 प्रकारचे विज्ञान मॉडेल मांडण्यात आले होते. प्रकल्पातील एकुण 79 शासकिय व अनुदानित आश्रमशाळेनी यात सहभाग घेतला होता.सर्वच गटातील स्पर्धकांमध्ये आपल्या मॉडेल विषयी मांडणी आणि माहिती देताना जिंकण्याकरिता चुरस दिसून आली. प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे (भा.प्र.से) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी पांढरुण येथील सरपंच श्री. किशोर अहिरे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शिवाजी कणसे, पांडूरंग देवरे,.दिनेश अहिरे, पिंटू पवार, बापू सोनवणे आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते. प्रकल्पातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी. व्ही. निकम, एम. एस.जाधव, शिक्षण विस्तार अधिकारीश्री पवार , श्री. चौधरी, श्री. पाटील, श्री.नेटके, श्री. राजपूत, आदिवासी विकास निरिक्षक श्री. बागुल व इतर अधिकारी कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी विभागीय तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रकल्पाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील मा. प्रकल्प अधिकारी महोदयांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अहिरे यांनी केले तर मुख्याध्यापक श्री. पांगुळ पी. व्ही. यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आश्रमशाळा पांढरुण येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचे हस्ते प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन २ चे उद्घाटन
0