धुळे, जळगाव व पुणे येथे जाणा-या व येणा-या बसेस दिनांक १८ जानेवारी २०२४ पासून नविन बसस्थानक ऐवजी जुने बसस्थानक येथून मार्गस्थ होतील.
मालेगाव, १७ जानेवारी २०२४ : मालेगांव नविन बसस्थानक जवळील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्यात आहे. या कामामुळे वाहतुक कोंडी होत आहे. यामुळे काही बसेसच्या फेऱ्या जुना बसस्थानक येथे वळविण्यात येणार आहेत.
मालेगांव आगाराच्यावतीने आयोजित बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आयुक्त, मालेगांव महानगरपालिका, मालेगांव, सहा. पोलीस निरीक्षक, मालेगांव शहर उपस्थित होते.
या निर्णयानुसार धुळे, जळगाव व पुणे येथे जाणा-या व येणा-या बसेस दिनांक १८ जानेवारी २०२४ पासून नविन बसस्थानक ऐवजी जुने बसस्थानक येथून मार्गस्थ होतील.
या निर्णयामुळे प्रवाशांना काहीसा त्रास होऊ शकतो. मात्र, उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू होतील, असे आगाराने सांगितले.