📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सटाणा पोलिसांची दमदार कामगिरी, अवघ्या काही तासात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

लखमापूर, 13 जानेवारी 2024 - सटाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत अवघ्या काही तासातच मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विनोद छोटू पवार यांचा मोबाईल लखमापूर येथून चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. त्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. तक्रार दिल्याच्या काही तासातच पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत दोघा आरोपींना  शिताफीने अटक करत त्यांच्याजवळून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे दिनेश भाऊसाहेब पानपाटील (१९) व मनदीप माणिक देवरे (१९) अशी आहेत. त्यांच्याकडून दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची बजाज पल्सर मोटासायकल असा एकूण १,४८,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणदिवे, सहा. पोलीस निरीक्षक राजपूत व सहा. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लखमापूर दूरक्षेत्राचे पोहवा. ठोके, पोहवा. शिसोदे व पोशि. सिकंदर कोळी यांनी केली.

या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि. राजपूत करत आहे.

सटाणा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिकांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने