📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाशिक: महात्मा फुले विकास महामंडळाच्या कनिष्ठ लिपिकला लाच घेताना रंगेहात पकडले

नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२३: नाशिक येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात कार्यरत कनिष्ठ लिपिक छाया विनायक पवार यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सापळा कारवाईत २००० रुपयांची लाच पकडण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदार यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात व्यवसायासाठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजूर होण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्या मुलाचे नावे कर्ज मंजूर होण्यासाठी आलोसे छाया पवार यांनी तक्रारदाराकडून ३००० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सापळ्यात पडलेल्या आलोसे छाया पवार यांनी तक्रारदाराकडून २००० रुपये लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस हवालदार प्रणय इंगळे, महिला पोलीस हवालदार ज्योती शार्दुल, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे आणि चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा सहभाग होता.

या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करावा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग- संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :

दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२५७८२३०
टोल फ्री क्रमांक : १०६४

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने