📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रीपेड मीटर, एमपीसीएल हटवा, घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज, विजेचे दर कमी करा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण

मालेगाव, दि. 9 (चंद्रकांत सोमवंशी) : महाराष्ट्र शासनाने नाशिक व जळगाव झोनमध्ये प्रीपेड मीटर बसविण्यासाठी एनसीसी कंपनीला दिलेल्या ठेकेला विरोध करण्यासाठी तसेच मालेगाव पावर सप्लाय कंपनीच्या वतीने ग्राहकांना प्रचंड त्रास दिला जात असून मनमानी कारभार करणाऱ्या एम पी सी एल कंपनीला तात्काळ हटवावे व पुन्हा म .रा. विद्युत वितरण कंपनीला मालेगाव शहराचा कारभार सोपावावा आणि राज्यात घरगुती वीज ग्राहकांना इतर राज्यांप्रमाणे 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करावा त्याचबरोबर देशात सर्वाधिक विजेचा दर हा महाराष्ट्रात असून तो अवाजवी असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही विजेचे दर कमी करून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा करावा या मागण्यांसाठी मालेगाव हिंदू मुस्लिम एकता संघटनेतर्फे सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड मालेगाव येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

या उपोषणाला मालेगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, उद्योजक यांनी पाठिंबा व्यक्त केला असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मालेगाव हिंदू मुस्लिम एकता संघटने तर्फे करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र शासनाने नाशिक व जळगाव झोनमध्ये प्रीपेड मीटर बसविण्यासाठी एनसीसी कंपनीला दिलेल्या ठेक्याला आम्ही तीव्र विरोध करतो. या प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना मोठा त्रास होणार आहे. तसेच मालेगाव पावर सप्लाय कंपनीच्या वतीने ग्राहकांना प्रचंड त्रास दिला जात असून मनमानी कारभार केला जात आहे. एम पी सी एल कंपनीला तात्काळ हटवावे व पुन्हा म .रा. विद्युत वितरण कंपनीला मालेगाव शहराचा कारभार सोपवावा,
राज्यात घरगुती वीज ग्राहकांना इतर राज्यांप्रमाणे 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करावा. देशात सर्वाधिक विजेचा दर हा महाराष्ट्रात असून तो अवाजवी असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही विजेचे दर कमी करून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा करावा अशीही मागणी संघटनेतर्फे करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने