📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धुक्याने घेतला तिघांचा जीव; पुण्याजवळ झालेल्या अपघातात जायखेडा येथील तीन ठार, पाच जखमी

पुणे जिल्ह्यात आज सकाळी आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात झाला आहे. क्रूझरला टेम्पोने दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले.

पुणे जिल्ह्यात आज सकाळी आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात झाला आहे. क्रूझरला टेम्पोने दिलेल्या धडकेत तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना पुणे नाशिक बायपास मार्गावर घडली. दरम्यान, या मार्गावर धुके पडले असल्याने चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघात ठार झालेले तिघे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. 
पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय ५०) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. सातारा अशी मृतांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी क्रूझरमध्ये काही प्रवासी नाशिक पुणे बायपासने जात होते. दरम्यान, त्यांची गाडी ही मंचर जवळ आली असता पुढे असणाऱ्या टेम्पोला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की क्रूझरमधील ३ प्रवासी जागीच ठार झाले तर पाच जण जखमी झाले. अपघात झाला तेव्हा महामार्गावर मोठे धुके होते.


दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक मदतीला धावले. त्यांनी तातडीने जखमींना मंचर येथील रुग्णालयात दाखल केले. पाच जखणी पैकी तिघांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झाले नसले तरी रस्त्यावर पडलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नसावा त्यामुळे हा अपघात असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने