नाशिक, दि. 30 नोव्हेंबर 2023: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी आज एका ग्रामसेवकाला रंगेहात पकडले. या ग्रामसेवकाने शासकीय ठेकेदाराकडून लाच घेतली होती.
या कारवाईत ग्रामसेवक अनिलकुमार मनोहर सुपे (वय 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी, ग्रामसेवक, वाढोली, पद- वर्ग 3 ता.त्र्यंबक जिल्हा- नाशिक) याला 1,04,000/- रुपये लाच घेताना पकडण्यात आले.
या कारवाईत सापळा अधिकारी निलिमा केशव डोळस (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी आणि पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांचा समावेश होता.
कारवाईत आढळून आले की, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली,त्र्यंबक ग्रामपंचायत अंतर्गत चे. निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्या.मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिक चे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.सदर कामे तक्रारदार यांनी विहित कालावधी मध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली असून 2,99,776/- या रकमेचे बिल हे वाढोली,ग्रामपंचायत कडून मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदार हा आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिल बाबत विचारणा करत होता. सदर बिल मंजुर करण्यासाठी 30 हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे त्याचे बक्षीस म्हणुन 70 हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे 4 हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार रुपयांची आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.29/11/2023 रोजी मागणी करून दि.30/11/2023 रुपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांच्यावर सरकार वाडा पोलीस स्टेशन ,नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचारविरोधी लढ्यात एक महत्त्वाची पायरी उचलली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या समस्येवर आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न अधिक प्रभावी होतील अशी अपेक्षा आहे