मालेगाव : येथील पूर्व व पश्चिम भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना एकत्र येत महावितरण विरोधात जनआंदोलन छेडण्याच्या पवित्रात दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने येथील ए टी टी हायस्कुल येथे बैठक संपन्न झाली.
अलीकडेच महावितरणने चार खासगी कंपनीला स्मार्ट मीटर बसविण्याचे कत्रांट दिले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. सध्या मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गाची वीज बिल भरण्यास वाताहात होत असून. प्रीपेड स्मार्ट मीटर आल्यावर मीटरची किंमत व त्यानंतर ऍडव्हान्स बिल कसे भरणार ? हा मुख्य प्रश्न नागिरकाना पडला असून करोना नंतर बाजारपेठेचे व व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून हा अतिरिक्त मार कसा सहन करणार ह्या अतिरेकाला आजच नाही रोकले तर येणारा काळ अतिशय भयानक असणार असल्याची मत बैठकीत व्यक्त केले गेले.
मालेगावच्या पश्चिम भागात ह्या विषयाच्या दोन ते तीन बैठका होऊन आज पूर्व भागात पहिली बैठक घेण्यात आली. अधिवेशन पूर्व हा लढा उभारण्यासाठी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पॉवर लूम संघटना, व्यापार संघटना, सामाजिक संघटना तसेच राजकीय जोडे बाजूला ठेवून ह्या लढ्यात उतरण्यास तयार असलेले पदाधिकारी अश्यांना ह्या समितीत सामावून घेऊन व्यापक बैठक घेऊन मोठ्या आंदोलनाची तयारी करण्याबाबत ह्या बैठकीत सहमती झाली .
यावेळी रामदास बोरसे, जमील क्रांती, निखिल पवार, देवा पाटील, सोहेल डालरीया मो. अयुब कासमी, ओम गागरणी, साजिद अन्सारी, विवेक वारुळे, जयप्रकाश पठाडे, गजानन येवले, अकलाक बडे मुकादम, प्रवीण चौधरी, सोहेल अह मो करीम, अब्दुल वाहिद मो याकूब, के डी महाजन, शेख कलिमुद्दिन शेख अलीमद्दिन, सुशांत कुलकर्णी, अंजुम इमामुर रहेमान वाहिद, अंजून हुसेन कँपाऊड इंजिनियर, पंकज रामविलास बडाळे, श्रावण वेताळ, समाधान कदम, सहील अह जलाल अह, अन्सारी अतीक अहमद, इम्रान इंजिनियर, मुबिन अप्सरा, इम्तियाज कैसर, मो. गरिफ फजलू रहेमान, अतीक जुबेरी आदी उपस्थित होते.