📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कन्नड घाटात तवेरा गाडी दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 7 जखमी

चाळीसगाव, २७ नोव्हेंबर २०२३ - चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कन्नड घाटात रविवारी रात्री ११:३० वा. एक तवेरा गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील एका कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे धार्मिक कार्यक्रमासाठी तवेरा वाहन क्र. एम एच ४१ वी ४८१६ ने निघाले होते. परतीच्या प्रवासात रात्रीच्या अंधारात आणि धुक्यामुळे गाडीचा चालक नियंत्रण गमावून वाहनासह दरीत कोसळले. या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५) आणि पूर्वा गणेश देशमुख (वय ८) यांचा मृत्यू झाला.

अपघातात अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय -४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०) आणि पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महामार्ग सुरक्षा पथक कर्मचारी आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ मदत कामी हजर झाले. जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात आले.

सदर अपघात पावसामुळे धुके पसरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, पुढील तपास पोऊनि कुणाल चव्हान करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने