📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

TV51, साक्री येथे सशस्त्र दरोडा ; दरोडेखोरांनी केले तरुणीचे अपहरण TV 51 #sakri #kidnapping #jay

साक्री, २६ नोव्हेंबर २०२३: साक्री येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वती नगर येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ घाव घेत दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले आहे.

दरोड्यांसोबतच तरुणीचे अपहरण केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासोबतच तरुणीला सुरक्षित परत आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. घटनेबाबत ज्योत्स्ना निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.



दहीवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. ज्योत्स्ना पाटील यांचे पती निलेश पाटील काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची भाची निशा मोठाभाऊ शेवाळे हिला सोबत बोलावले होते.

दरोेडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर झटापट करत, तोंड हाताने दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रांचा धाक दाखवत अंगावरील कानातील सोन्याचे काप, पट्टीची माळ, मनी मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण असे एकूण ८८ हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी पोलिसांनी सांगितले.

तसेच वरील ऐवज हिसकावल्यानंतर हात, पाय बांधून, तोंडात बोळा कोंबून मागील रूममध्ये लोटले व भाची निशा शेवाळे हिला घेवून पळून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर काही वेळानंतर ज्योत्स्ना पाटील यांनी कसेबसे हात सोडवून खिडकीची काच उघडत आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाश्यांना सदर प्रकार लक्षात आला व त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. यानंतर श्वान पथक, ठसे तज्ञ यांना रात्रीच बोलावून नमुने घेण्यात आले व शहरातून बाहेर पडणाऱ्या आजूबाजूला सर्व रस्त्यांनी दरोडेखोराचा शोध सुरू करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पिंपळनेरचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हे देखील पथकासह रात्रीच घटनास्थळी पोहोचत त्यांनी देखील शोध सुरू केला आहे.

ही घटना अत्यंत गंभीर असून सोशल मीडियावर सुद्धा सदर तरुणीचे फोटो टाकत तरुणीचे शोध घेण्याची विनंती करण्यात येत आहे. पोलीस सध्या दरोडेखोरांचा शोध घेत असून तरुणीला लवकरच सुखरूप परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने