जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीवर झालेल्या स्पर्धेत कु.पार्थ सचिन शिंदे याने योगा व रिधमिक योगा अशा योगा प्रकारात एल व्ही एच अकॅडमीच्या योगा पटू विदयार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे, कु.पार्थ याचा नुकताच महात्मा गांधी विद्यामंदिर अंतर्गत संस्थास्तरीय झालेल्या शिक्षक दिनाच्या सत्कार समारंभात नाशिक येथे सत्कार झाला आहे, पार्थ हा लहान वयापासूनच सर्व प्रकारच्या योगा मध्ये निष्णात असून त्याचे शरीर अतिशय लवचिक आहे, जिल्हा पातळीवरील योगा आणि रिधमीक योगा अशा दोघ योगा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे, पार्थ यास सोहम योगा अकाडमीचे चेतन वाघ सर तसेच सी बी एस ई बोर्डाचे क्रीडा शिक्षक निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे, चिरंजीव पार्थ याचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, माजी शिक्षक आमदार डॉ. अपुर्वभाऊ हिरे व शिवसेना उपनेते डॉ. अद्वयआबा हिरे- पाटील यांनी अभिनंदन केले आहे.