📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

हिंदी वर्तन व ज्ञानाची भाषा व्हावी :- मुख्याध्यापक रामदास खरे

मालेगाव - योगेश पगारे 

हिंदी भाषा साहित्य हे भारतात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. या साहित्याचा उपयोग करून आपण आपल्या ज्ञानात भर पाडून आपण समृद्ध होवू शकतो. हिंदी भाषेचा ज्ञान व वर्तन भाषा म्हणून आपण वापर करायला हवे असे प्रतिपादन मुख्याध्यापक रामदास खरे यांनी केले ते सोमपूर ता.बागलाण येथील मविप्र समाज संचलित नेहरू विद्यालयात हिंदी दिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
        सरस्वती च्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक रामदास खरे  यांच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी मिनल अंकुशे, भाग्यश्री राखपसरे, वेद नेरकर ,दिपराज शिंदे  यांनी भाषण केले. 
        विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक किशोर देवरे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले.
         व्यासपीठावर मुख्याध्यापक रामदास खरे जेष्ट शिक्षक जिभाऊ खैरणार, चंद्रकांत मावची,राजेंद्र निकम, विवेक सावंत, प्रविण जगताप,  किशोर देवरे, प्रशांत देवरे,विजय भामरे, कैलास हिरे, सुवर्णा देवरे, निलेश खैरणार, दिपाली कापडणीस, सुमित भदाणे, शालीनी सुर्यवंशी, सुप्रिया बिरारी, क्रांती गांगुर्डे, रोहिणी अहिरराव, तुषार भामरे, दिपाली देसले , पुनम पवार, गणेश शेळके, मंगेश सोनवणे आदी उपस्थित होते. 
        कार्यक्रम यशस्वितेसाठी विलास पवार, गणेश सोनवणे, शरद शिंदे, आबा पवार, कविता पाटोळे, आशा घरटे यांनी परिश्रम घेतले. 
कार्यकमाचे  सुत्रसंचालन महेश खैरणार व आभार गायत्री भामरे यांनी व्यक्त केले


 - सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करतांना मुख्याध्यापक रामदास खरे व शिक्षक वृंद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने