पारंपारिकतेचा व सांस्कृतेचा ठेवा म्हणजे आजी-आजोबा:- मुख्याध्यापक रामदास खरे
पारंपारिकतेचा ठेवा व सांस्कृतेचा ठेवा म्हणजे आजी आजोबा त्यांच्यामुळेच पिढ्यानपिढ्या संस्कृतचे विचारांचे संक्रमण होते. आजच्या नविन पिढीला यथोचित मार्गदर्शन करण्याचे काम आजघ-आजोबाच करत असतात. आज धावपळीच्या युगात आई-वडिल कामानिमित्त बाहेर असतात त्यावेळी घराची व नातवांची देखभाल व संगोपन यांची जबाबदारी आजी-आजोबांवर असते ते त्यांच्या स्वअनुभावानुसार यथोचित पार पाडत असतात. कुटुंबातील प्रत्येकाने आजी-आजोबा यांचा मान राखायला हवा. त्यांच्या रागवण्यात प्रेम असते, त्यांच्या रागाचे वाईट वाटून घेवू नये असे प्रतिपादन मुख्याध्यापक रामदास खरे यांनी केले. ते मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श शिशू विहार, अभिनव बाल विकास मंदिर व नेहरू विद्यालय सोमपूर ता.बागलाण येथे आयोजित आजी-आजोबा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष आण्णा भामरे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली सरस्वती पुजन शालेय समिती अध्यक्ष सुभाष आण्णा भामरे सदस्य सुरेश दादा भामरे, पंढंरीनाथ आण्णा नहिरे सर हरी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली
विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्याचे आजी-आजोबा उपस्थित होते. आजी-आजोबांनी स्वानुभव व्यक्त केले. सरतेशेवटी आजी-आजोबांचे पुजन करण्यात आले.व्यासपीठावर मुख्याध्यापक रामदास खरे जेष्ट शिक्षक जिभाऊ खैरणार, चंद्रकांत मावची,राजेंद्र निकम, विवेक सावंत, प्रविण जगताप, किशोर देवरे, प्रशांत देवरे,विजय भामरे, कैलास हिरे, सुवर्णा देवरे, निलेश खैरणार, दिपाली कापडणीस, सुमित भदाणे, शालीनी सुर्यवंशी, सुप्रिया बिरारी, क्रांती गांगुर्डे, रोहिणी अहिरराव, तुषार भामरे, दिपाली देसले , पुनम पवार, गणेश शेळके, मंगेश सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विलास पवार, गणेश सोनवणे, शरद शिंदे, आबा पवार, कविता पाटोळे, आशा घरटे यांनी परिश्रम घेतले.
कार्यकमाचे सुत्रसंचालन आभार कैलास हिरे यांनी केले तर आभार राजेंद्र निकम व्यक्त केले
