मनमाड (मालेगांव लाईव्ह न्युज) येवला तालुक्यातील नगरसुल येथे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएस ने गुप्त बातमीच्या आधारे संयुक्त कारवाईत एकाला ताब्यात घेतले आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशयावरून त्यास ताब्यात घेण्यात आले होते.
नगरसुल रेल्वे स्थानकावरून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले व काही तासांच्या कसून चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे समजते. हा संशयित गणेश मंडळांचे चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना नगरसुल येथून त्यास ताब्यात घेतले होते, सदर संशयित मालेगाव येथील असल्याचे समजते.
TV51 मालेगाव Liveचा नवीन WhatsApp चॅनल लाँच झालं आहे!
लगेच फॉलो करा🙏🏻🙏🏻
या चॅनलवर प्रसारित केलेले सर्व काही TV51 Malegaon Live च्या www.malegaonlive.com या संकेतस्थळावर आणि https://YouTube.com/MalegaonLive/ व https://YouTube.com/TV51./ चॅनलवर उपलब्ध असतील