📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रतीकाशी लोहोणेर येथे ऋषीपंचमी निमित्ताने महिला भाविकांचा अलोट जनसागर; परिसराला यात्रेचे स्वरूप

लोहोणेर येथे ऋषिपंचमी निमित्त माता-भगिनीची अलोट गर्दी; गावाला आले यात्रेचे स्वरूप...

(प्रतिनिधी - आढाव सर देवळा)
प्रतीकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गिरणा तीर्थ क्षेत्रावर सातत्याने वर्षभर विविध हिंदू तिथी पर्व निमित्ताने उत्सवा दरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असते

आज ऋषिपंचमी निमित्ताने गिरणा स्नान घाटावर हजारो महिला भगिनींनी स्नान केले. यावर्षी देखील सटाणा देवळा दोन्ही तालुक्यातील व परिसरातील दरवर्षीप्रमाणे माता भगिनींची सेवा करण्यासाठी यावर्षी देखील सालाबादप्रमाणे कार्यक्रम सर्वच महिला भगिनींपर्यंत पोहोचेल याचं नियोजन करून आयोजित करण्यात आला होता महाप्रसाद व केळी, चहा, पाणी करण्यासाठी 
लोहोणेर गावातील प.पू.संत स्वामी अनेकरूपी महाराज भक्त परिवार लोहोणेर व लोहोणेर सर्वच मित्रपरिवार 

 नदीकिनारी पूजा विधी करण्यासाठीची जागा जेसीबी ट्रॅक्टर च्या साह्याने समतल करून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी सोय करण्यात आली या करिता ग्रामपंचायत लोहोणेर चे सर्वच पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्वच नागरिकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने