प्रतिनिधी देवळा - आढाव सर
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूर पाडे विद्यालयात भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे लेझीम पथक व टिपरी पथक प्रभात फेरीत उत्साहात सहभागी झाले होते. स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण एस.एस.सी परीक्षा मार्च 2023 ला विद्यालयात 84 टक्के गुण मिळून प्रथम आलेली विद्यार्थीनी कुमारी. साक्षी प्रकाश बच्छाव हिच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी विद्यार्थी प्रतिष्ठित युवा नागरिक श्री. खंडेराव आढाव यांनी भूषवले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अभिमन देवराम अहिरे यांनी दिलेले प्रथम आलेली विद्यार्थीनी साक्षी प्रकाश बच्छाव 1100 रुपये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण कुमारी रामेश्वरी मधुकर ठाकरे 500 रुपये तर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण कुणाल समाधान चतुर्थ क्रमांक उत्तीर्ण ऋषिकेश सुभाष अहिरे व कुमारी किरण नंदकिशोर अहिरे तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण कुणाल समाधान काळे यांना प्रत्येकी 101 याप्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर सन- 1999-2000 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीला शिकत असलेले माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना रुपये 15500चे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री अभिमन देवराम अहिरे, विश्वस्त श्री शिवाजी दोधा अहिरे ,श्री. दोधा काशिनाथ अहिरे,श्री. नथू राजाराम देवरे,श्री. चंद्रभान ज्ञानदेव अहिरे, देवपूरपाडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य श्री. अजय अहिरे माजी विद्यार्थी खंडेराव आढाव, अभिमान काळे ,राकेश जाधव, गणेश जोंधळे यांच्या सह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.डी. सूर्यवंशी सर यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक श्री.जे.यू. वाघ सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी श्रीमती. एम.एन जोंधळे,श्री बी.पी देवरे, श्री.एम. एस अहिरे,श्री कदम पी.पी, श्रीमती पी.आर. वाघ श्री बी.के. बिरारी श्री. एम ए ठाकरे श्री.बी.टी.आढाव यांनी परिश्रम घेतले.