आज बुधवार दि.29 / 03/2023 रोजी
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरगाव चे पोलीसपाटील सिताराम गोतरने बाबा हे होते.व्यासपीठावर विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.कांगुणे सर व इतर मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मा.गाडे सर यांनीं केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती चे पूजन करण्यात आले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर विदयालयाचे मुख्याध्यापक मा.कांगुणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतातून अभ्यासा बरोबरच तुमच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव दिला पाहिजे आपल्यात असणारे सुप्तगुण ओळखून त्यात आपण करिअर करू शकतो म्हणून शालेय स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात .यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री.पाटील सर यांनी केले तर आभार उपशिक्षिका श्रीम.ज्योती भामरे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

