( मालेगाव) येथील प्रा. रुबीना अब्दुल सत्तार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांच्या प्रबंधाचा विषय *ॲन ऍनालिटीकल स्टडी ऑफ चॅलेंजेस इन लर्निंग इंग्लिश ॲज अ सेकंड लैंग्वेज बिफोर कॉलेज स्टूडेंट इन मालेगाव टाउन ऑफ महाराष्ट्रा* हा होता. त्यांना डॉ निर्मला पद्मावत यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ रुबीना सत्तार ह्या जे ए टी महिला महाविद्यालय तसेच एम जी व्ही. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सिटी कॉलेज येथे इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत त्यांनी 2018 मध्ये सेट या परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश संपादन केले होते. त्यानंतर अथक प्रयत्न करून कठोर परिश्रमाद्वारे त्यांनी आपला शोध निबंध सादर केला आणि सदर यश संपादन केले . त्यांच्या यशात त्यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ सलमा अब्दुल सत्तार यांचा मोलाचा वाटा आहे . इंग्रजी विषयात पीएचडी प्राप्त करणारी मालेगावातील पहिली मुस्लिम महिला होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे डॉ. रुबीना यांच्या यशाबद्दल जे ए टी ट्रस्टचे अध्यक्ष मान. आल्हाज निहाल अहमद अन्सारी यांनी तसेच व्यवस्थापन समितीने कौतुक केले. त्याचप्रमाणे गांधी विद्यामंदिर संस्थेचे मान. डॉ प्रशांत दादा हिरे, डॉ. अपूर्व भाऊ हिरे , डॉ अद्वय आबा हिरे यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे डॉ हारुण अन्सारी (प्राचार्य जे ए टी महिला महाविद्यालय) डॉ आरिफ अंजुम (प्राचार्य सिटी कॉलेज) डॉ. शाकेब, प्रा. मेश्रामकर, डॉ राज त्रिभुवन, प्रा. मुनव्वर अहमद, प्रा. झर्रिन, प्रा अताउर रहमान नूरी, आणि उमर फारुक यांच्यासह जे एटी तसेच गांधी विद्या मंदिर सिटी कॉलेज येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले
मालेगावात इंग्रजी विभागात पीएचडी मिळणारी प्रथम मुस्लिम महिला डॉ रुबीना सत्तार
0