( मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि विकास समिती आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते . प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार या होत्या. त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिला सुरक्षा आणि विकास समिती यांच्या समन्वयक प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी प्रास्ताविक केले आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी मालेगावातील योग विद्या धाम येथील प्रसिद्ध योग अध्यापिका सौ. मेधा सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमाचे आयोजन झूम मीटिंग द्वारे ऑनलाइन करण्यात आले होते. त्यांनी *विमेन हेल्थ अँड फिटनेस रेमेडीज* या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली
जे ए टी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
0