📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळ्याच्या शेतकऱ्यांचा अजब ठराव ; संपूर्ण गावचं सरकारला विकण्याचा निर्णय

राकेश आहेर:- (देवळा)

   कुठल्याच शेतमालाला दर मिळत नसल्याने आत्महत्या करण्यापेक्षा किमान उदरनिर्वाह करुण जगण्यासाठी तरी पैसे मिळावेत म्हणून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी चक्क शासनालाच संपूर्ण गावचं विकायचा निर्णय घेतला आहे. या गावाच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
    माळवाडी गावात सुमारे ५३४ हेक्टरवर शेतकरी शेती व्यवसाय करत आहेत. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य,आणि कांद्याचे प्रमुख पीक घेतले जात आहे. यात गेल्या ३ ते ४ वर्षापासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला फुटक्या कवडीचाही दर मिळत नाही आहे. उलट शेती पिके घेण्यासाठी लाखों रुपये बॅंकांची कर्ज घेऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.जर लाखों रुपये खर्च करून जर शेतमालाला दरचं मिळतं नसेल तर मग शेती ठेऊन उपयोगाचं काय असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
     देवळा तालुक्यात सर्वत्र कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे, यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेती व्यवसायातुन उपल्बध होत नाही. त्यामुळे गाव विकून त्यातील पैशाने निदान जगता तरी येईल म्हणून असा निर्णय घेतला आहे. 
    दैनंदिन गरजा व खाजगी सरकारी बँकांची कर्ज चुकती करण्यासाठी आज रोजी कुठलाही पर्याय उरलेला नसल्या कारणाने माळवाडी येथील संपूर्ण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन याबाबत ठराव देखील केला आहे. ठरावात गाव विकण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार आहे. यामध्ये शासनाने शेतकऱ्याच्या गरजा भागवण्यासाठी व कर्ज मुक्त करण्याइतके शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे, ते सरकाने विकत घेण्याची मागणी संपूर्ण शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने