📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावचे राहुल गवळी यांची MSEDCL कंपनीत सह-अभियंता वर्ग-१ पदासाठी सरळसेवा परीक्षेमधून निवड झाल्याबद्दल सत्कार

 
       राहुल कैलास गवळी यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सह अभियंता वर्ग १ पदासाठी सरळसेवा परीक्षेमधून निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला

 राहुल गवळी यांनी हलाखीच्या परिस्थितीतून अमरावती येथून ईलेट्रिकल इंजिनीरिंगचे शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांच्या चार म्हशी असून त्यावर ते दूध व्यवसाय करतात. कर्ज काढून त्यांनी राहुल यांचे शिक्षण केले ते आज सार्थकी लागले. राहुल गवळी हुतात्मा स्मारक वाचनालयात गेल्या दोन वर्षा पासून अभ्यास करत होते त्यांनी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या त्यात त्याला अपयश आले. त्यावर खचून न जाता जिद्दीने अभ्यास करत राहिल्याने शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले.

     हुतात्मा स्मारक, टिळक नगर मालेगाव येथे मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने वाचनालय चालवले जात असून या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी भारतीय सैन्य दलात, पोलीस दलात, राज्य उत्पादन शुल्क विभागात, मंत्रालयात विविध पदांवर निवड झाल्याबद्दल निखिल पवार यांनी आनंद व्यक्त केला व हुतात्मा स्मारक येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे मागणी केली.

     यावेळी देवा पाटील, प्रवीण चौधरी, सुशांत कुलकर्णी, इंजि. सलाम कुरेशी, सजन पाटील, समाधान अहिरे हुतात्मा स्मारक वाचनालयातील विद्यार्थी तुषार संभाजी पाटील, जुबेर मजीद पिंजारी, जयेश किशोर वाघ, संदीप राजेंद्र गवळी, लखन परदेशी, सुनील अहिरे, योगेश अहिरे, तुषार देवरे, चेतन मोहिते, योगेश खैरणार, आकाश ठाकरे, गणेश ठाकरे, स्वप्नील सोनवणे, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने