📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भूईकोट मालेगावची अस्मिता असून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी


अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, अपर तहसीलदार साळुंके मॅडम, किल्ला पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक भदाने, नगररचनाकार संजय जाधव, सह पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर हे अधिकारी उपस्थित होते.

भुईकोट किल्ला बचाव समितीच्या वतीने रमादास बोरसे, निखिल पवार, देवा पाटील, भरत पाटील, कैलास शर्मा, गोपाळ सोनवणे, सुशांत कुलकर्णी उपस्थित होते.

भुईकोट किल्ल्याबाबत दाखल याचिकेवर लोकायुक्त न्या कानडे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने समिती तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

रामदास बोरसे यांनी याचिकेवर सुनावणी होऊन दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली, निखिल पवार यांनी किल्ला मालेगावची अस्मिता असून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली. 

अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे मॅडम यांनी यावर जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व विभागांची बैठक येत्या 15 दिवसात घेण्यात येईल तो पर्यंत मनपा प्रशासनाने अतिक्रमण पुनर्वसन करण्यासाठी विस्तृत विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच २६ जानेवारी रोजी धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली, त्यास समितीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून २६ जानेवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले व भुईकोट किल्ला बचाव समितीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने