📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वन जमिनीची विक्री?? करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : सामाजिक कार्यकर्ते गणी शाह यांचे निवेदन

मालेगाव - नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात असलेली वनविभागाची जमिनीची परस्पर विक्री करून त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामास परवानगी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणी शाह यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांचे मार्फत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे. या वनजमिनीची नोंद बदलून त्या क्षेत्राला वनेत्तर दाखविण्यात येऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. संबंधित वनजमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, प्रकल्पाच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, ही वनजमीन असून, त्यावर अधिकृत बांधकाम केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी या व्यवहाराला मान्यता देणाऱ्या संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी गणी यांनी मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच त्यांच्या स्थावर मालमत्तेची ए. सी. बी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडीच्या सर्व्हे दहामधील काही क्षेत्रातील जमिनीचे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यात काही वनजमिनीचा समावेश आहे. या व्यवहारांची सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रियादेखील जलद गतीने पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जात असल्याचे गणी शाह यांनी सांगितले 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने