📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रामेश्वर कृषी मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने खारिफाटा येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम संपन्न


राकेश आहेर:- (देवळा)

  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव, व श्री रामेश्वर कृषी मार्केट महात्मा फुलेनगर खारीफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान -२०२३ समारोप राबविण्यात आले.
   अनिकेत भारती (अपर पोलीस अधीक्षक मालेगाव)यांच्या अध्यक्षतेखाली, किरण भालेराव (प्रसिद्ध सिने अभिनेता ), प्रदीप शिंदे (प्रादेशिक परिवहन अधिकारी), चंद्रशेखर देशमुख (उप विभागीय अधिकारी) तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला. 
     प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन रांगोळी प्रदर्शनाची मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्वागत/सत्कार श्री रामेश्वर कृषी मार्केट तर्फे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा यावर वाहतुकीचे नियमांचे मार्गदर्शन केले. तसेच मार्केट यार्डात आलेल्या ट्रॅक्टर वाहनांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले. मार्केटच्या आलेल्या आवकेपैकी सर्व ट्रॅक्टर वाहनांना मार्केट च्या वतीने रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहेत सदर कार्यक्रमास वरील प्रमुख पाहुण्यांसह वासुदेव भगत (सहा.प्रा.प.आधिकारी), डॉ.शरद शिरोळे (संमोहन तज्ञ), डॉ. शैलेंद्र (गायकवाड बालरोग तज्ञ), डॉ. हर्षल नेहते (जिल्हा आरोग्य अधिकारी), प्रकाश ओस्तवाल (मा. सरपंच उमराणे), खंडूकाका देवरे (अध्यक्ष - नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन) श्रीपाल प्रकाश ओस्तावाल (मुख्य संचालक श्री रामेश्वर कृषी मार्केट), पुंडलीक आंनदा देवरे ( संचालक श्री रामेश्वर कृषी मार्केट), विनोद जाधव (उप प्रादेशिक परिवहन मालेगाव), राजू देवरे (मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे) पंकज ओस्तवाल (युवा उद्योजक उमराणे), दौलतराव गंगाधर शिंदे (सचिव श्री रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा), सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील शेतकरी राजे, व श्री रामेश्वर कृषी मार्केट चे कर्मचारी, व्यापरी, हमाल, मापारी व इतर घटक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन बोधले (मोटर वाहन निरीक्षक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने