राकेश आहेर:- (देवळा)
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिनानिमित्त उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळातर्फे गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल येथे नुकताच संपन्न झाला.
जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी मंडळाच्या स्थापनेपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावर्षीहि गरीब व होतकरू विद्यार्थांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथमता सकाळी उमराणे वतनाचे ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात श्रीफळ वाढवुन सोमवार दि.१६ जानेवारी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिना निमित्त छत्रपती संभाजीराजे चौकात राजेंच्या प्रतिमेचे पूजन तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उमराणे येथील डॉक्टर संभाजी सुर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक पि.के.सुर्यवंशी सर होते.
कार्यक्रमा प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रस्तावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून आजपर्यंत राबविलेल्या लोककल्याणकारी सामाजिक उपक्रमाची माहिती देत “ना आमचा कोणी नेता ना आम्ही कोणाचे कार्यकर्ते; आम्ही फक्त शिवरायांचे मावळे” या संकल्पनेतून मंडळाचे काम अखंडपणे गेल्या २८ वर्षांपासून सुरु आहे असे प्रतिपादन केले. यावेळी मुख्याध्यापक सुर्यवंशी सर यांनी आपल्या भाषणात मंडळाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करीत मंडळास पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्यात.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपमुख्याध्यापक संजय पाटील, परदेशी सर, चव्हाण सर, महाले सर, दत्तु पंडित देवरे, नितीन काला, केदा आण्णा देवरे, दगडू जमधाडे, माणिक देवरे, सचिन देवरे, संदीप देवरे, विक्रम देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सुनील देवरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.