राकेश आहेर:- (देवळा)
देवळा तालुक्यात अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी कंबर कसली आहे. पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यांच्या नेतृत्वाखालील टीमने तालुक्यातील वार्षी -हनुमंतपाडा शिवारात अवैध रित्या गावठी दारू बनविणाऱ्या ९ ते १० हातभट्टया उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे गावठी दारू बनवणाऱ्यांचे व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यात सर्रास देशी विदेशी दारू, गुटखा विकण्यणाऱ्यांचे, तसेच सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे, तरुण युवक जास्त करून व्यसनाच्या आहारी जाऊ लागला आहे. त्यास अंकुश बसावा यासाठी शिरसाठ यांनी कडक पाऊले उचलली आहेत.
सदर कारवाई मध्ये गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रासायनिक साहित्य, ड्रम, गावठी दारू नेस्तनाबूत करण्यात आल्याची माहिती देवळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी दिली असून यापुढे देखील तालुक्यातील अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांनी व बनवणाऱ्यांनी वेळीच सुधारण्याचे आव्हान केले आहे. आज करण्यात आलेल्या कारवाई मध्ये देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गवळी, पोलीस शिपाई मोरे, पोलीस कॉन्स्टेबल शेख तसेच होमगार्ड सहभागी झाले होते. देवळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेच्या वतीने स्वागत करण्यात येत असून यापुढे देखील पोलिसांनी आपलं कार्य चालू ठेवण्याची मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत शिरसाठ यांनिही मी जो पर्यंत देवळा तालुक्यात आहे तोपर्यंत कुठलेच अवैध धंदे चालू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे.