महेंद्र पगार ( कुकाणे )
सात दिवस गावात ज्ञानेश्वरी पारायण आयोजन करण्यात आले व जागरण गोंधळ , झाल्यानंतर लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात येते.
पालखी मिरवणुकीत काठी खेळ, लेझीमचा जोर धरत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष.
मालेगाव तालुक्यातील कुकाणे येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सावास काल रविवारपासून प्रारंभ झाला. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण केली गेली.
सतराव्या शतकात सई वंजारी नावाच्या महिलेला खंडेराव महाराजांनी मेंढ्या चारतांना दर्शन दिले तेव्हापासून याठिकाणी यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. यात्रोत्सव नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली. यात्रे प्रसंगी गावातील प्रत्येक घरा घरात नैवद्य म्हणून पुरण पोळ्यांचे नैवद्य केले जाते. तसेच गावातून भव्य अशी काठी (मांडव) मिरवणूक काढण्यात आली. गावातील बाल गोपाळ ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी होतात. प्रचंड प्रमाणात भंडाराची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार नावाच्या जयघोषाने कुकाणे नगरीत दुमदुमून निघाला .गावातून खंडेराव महाराजांची पालखी वाजत – गाजत मिरवणूक काढण्यात आली. पालखी खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात आली.