📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अहिरे विद्यालयात शालेय समितीचा सन्मान सोहळा

मविप्रचा शैक्षणिक रथ गतिमान करा : चिटणीस मा.दिलीप दळवी 

  ब्राम्हणगांव: ता. ४ : "बहुजन हिताय, बहुजन सुखाय " हे ब्रीद वाक्य घेऊन शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रि:सूत्रीवरच कामकाज केले जाईल.शिक्षक व संस्थेची कार्यकारणी हे यशस्वी रथाचे दोन चाके आहेत.दोन्ही चाके मजबूत असतील तरच संस्थेचा शैक्षणिक रथ गतिमान व्हायला उशीर लागणार नाही. त्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. ही भूमिका यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह संस्थेचा विकास व प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे.असे प्रतिपादन मविप्रचे चिटणीस दिलीप (भावसा ) दळवी यांनी केले.
        ब्राम्हणगांव ता.सटाणा येथील श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल,अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयच्या नवनिर्वाचित शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा.दळवी साहेब बोलत होते.
        यावेळी नवनिर्वाचित माध्यमिक शालेय समितिचे अध्यक्ष मा.श्री अतुल नरेंद्र अहिरे,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री किशोर रामदास अहिरे,अभिनव बाल विकार मंदिर शालेय समितीच्या अध्यक्षा मा.श्रीम.हिराबाई साहेबराव अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
       त्यांच्या निवडीबद्दल संस्थचे चिटणीस आदरणीय दिलीप ( भावसा ) दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माध्य.शालेय समितीचे सदस्य संदिप मधुकर अहिरे, माणिक रामचंद्र अहिरे,प्रकाश कौतिक अहिरे, विनोद सिताराम अहिरे, संजय भगवान अहिरे, निंबा नानाजी अहिरे, चंद्रकांत गोविंद अहिरे,अशोक काशिनाथ शिरोडे ,श्रीम सरला राघो अहिरे,अशोक राजाराम देवरे, बळीराम दौलत चव्हाण, भास्कर केवळ अहिरे, विश्वनाथ नथु वाघ, उच्च माध्यमिक शालेय समितीचे सदस्य सिताराम उखा अहिरे, भावराव वामन अहिरे,नानाजी पाडूरंग अहिरे, बाळासाहेब रामदास अहिरे,प्रसन्न रमेश अहिरे,हेमंत पोपट अहिरे, रामराव नामदेव अहिरे, भास्कर सुखदेव चव्हाण, सुर्यकांत भावराव बागुल, बाळासाहेब यशवंत जाधव, 
 दिपक मालजी अहिरे, मुरलीधर बळीराम चव्हाण,माणिक केदा भदाणे,नंदु दोधा चव्हाण,बाळासाहेब निंबा भामरे,तसेच अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे सदस्य केशव मानाजी अहिरे, माधव आनंदा पगार,संजय रघुनाथ जाधव, विश्वास जगन्नाथ खरे,हिरामण बापु नवरे,श्रीम शोभा राजेंद्र अहिरे,रविंद्र मन्साराम चव्हाण, सुरेश दोधा चव्हाण, बहिनाजी धोंडू चव्हाण, राजाराम कारभारी चव्हाण, दिपक वामन चव्हाण,आबाजी त्र्यंबक चव्हाण, नारायण आनंदा अहिरे या सदस्यांचा सत्कार संस्थेचे चिटणीस मा.श्री दिलीप (भावसा ) दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
       याप्रसंगी संस्थेचे चिटणीस सन्मा. श्री दिलीप (भावसा ) दळवी यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री डी.एस.सावंत यांनी केला.तसेच प्राचार्य सावंत सरांचा व पर्यवेक्षिका श्रीम.एम.बी.सोनवणे यांचा सत्कार दळवी साहेबांनी केला.
        याप्रसंगी विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी शालेय समिती, शिक्षक व पालक यांची भूमिका महत्त्वाची असते. शैक्षणिक सुविधांसाठी सर्व शालेय समिती कटीबंध राहतील असे आश्वासन विद्यालयाचे नवनिर्वाचीत उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.किशोर रामदास अहिरे यांनी दिले. तसेच श्री आबासाहेब चव्हाण व श्री माणिक भदाणे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकास कसा साध्य करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे सुचित केले.
      विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी उच्च माध्यमिक शालेय समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री. किशोर रामदास अहिरे यांच्या प्रयत्नातून *सफेक्स इंडिया लिमिटेड* या कंपनी कडून *वॉटर प्युरिफायर फिल्टर* मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या बद्दल विद्यालयाचे प्राचार्य मा.सावंत सरानी त्यांचे आभार व्यक्त केले. शाळा व पालक यांचा दुवा म्हणून शालेय समितीची भूमिका महत्वाची असते.विद्यालयाच्या सर्वांगीन विकासासाठी शालेय समितीचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य मा. सावंत सरांनी केले.
     या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य मा. सावंत सरांनी नवनिर्वाचित सर्व शालेय समित्यांना विद्यालयाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले असता पुढील मान्यवरांनी उस्फुर्तपणे रोख स्वरूपात देणगी दिली. त्यात 
श्री मुरलीधर बळीराम चव्हाण - ५१०० रुपये, श्री प्रकाश कौतिक अहिरे- ५१०० रुपये, श्री बाळासाहेब यशवंत जाधव - ५१०० रुपये, श्री प्रसन्न रमेश अहिरे - २१०० रुपये, श्री हेमंत पोपट अहिरे - यांनी तीन डस्टबीन देऊ केल्या. श्री अशोक काशिनाथ शिरोडे यांनी १००० लिटर पाणी टाकी देऊ केली. श्री माधव आनंदा पगार - २१०० रुपये, श्री हिरामण बापु नवरे - २१०० रुपये, श्री निंबा नानाजी अहिरे - २१०० रुपये, श्री माणिक रामचंद्र अहिरे - २१०० रुपये, श्री माणिक केदा भदाणे - ११०० रुपये, श्री सुर्यकांत भावराव बागुल - ११०० रुपये, श्री अशोक राजाराम देवरे - ११०० रुपये
विद्यालयाचे प्राचार्य मा.सावंत सरांनी सर्व दानशुर मान्यवरांचे मनापासून आभार मानले .
      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ए.एम.जगताप यांनी केले व श्री यु.एन.खरे यांनी आभारप्रदर्शन केले.
       याप्रसंगी पर्यवेक्षिका श्रीम. एम.बी.सोनवणे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने