📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मुंबई आग्रा महामार्गावर उमराणे येथे बसची कंटेनरला धडक

राकेश आहेर:- (देवळा)

  मुंबई आग्रा महामार्ग (एन.एच ३ वरील) उमराणे जवळील सांगवी फाटा येथे बस क्र ( नाशिक वरून चाळीसगावकडे जाणारी बस क्र (एम. एच १४ बी.टी २३५९) ही बस गतिरोधकाजवळ कंटेनरला पाठीमागून धडकल्याने बसमधील प्रवाशांना पुढील सिटचा व बसचा मार लागल्याने जखमी झाले आहेत. 
   या अपघातावेळी अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे उमराणे येथील मालेगाव शेतकी संघाचे माजी चेअरमन रत्नाकर शिवाजी देवरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांना मोबाईल वरून अपघाताची माहिती दिली.
    देवरे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली. तसेच उमराणे बाजार समिती, सौंदाणे, उमराणे व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकांना घटनास्थळी बोलावून जखमी प्रवाशांना तात्काळ उमराणे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. बसमध्ये ४० प्रवाशी होते. सर्वांना कमी अधिक प्रमाणात मार लागला आहे. तर दोन जणांना डोक्याला जास्त मार लागल्याने त्यांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
   या घटनेची माहिती मिळताच स्व. निवृत्ती काका बाजार समिती उमराणेचे पदाधिकऱ्यांनी  तातडीने रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच सोमा टोलवे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन अपघातग्रस्त क्षेत्राच्या जागी स्पिडब्रेकरजवळ ब्लिंकर लाईट देऊन साईनबोर्ड लाऊन पांढरे पट्टे मारण्याच्या सुचना केल्या आहेत. यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, बाजार समितीचे रुग्णवाहिका सेवक व कर्मचारी, तसेच उमराणे,सांगवी, चिंचवे येथील नागरिक व सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना मोलाची मदत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने