📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आश्रमशाळेतील शिक्षकांनी घेतले इंटरनेटच्या स्मार्ट वापराचे धडे....

आदिवासी विकास विभागातील नासिक प्रकल्प कार्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता कक्ष अंतर्गत शिक्षकांचे चार दिवसीय एज्युफेस्ट(शिक्षण परिषद) घेण्यात आले.सदर एज्युफेस्ट करीता नाशिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमधील जवळपास 500 पेक्षा जास्त शिक्षकांना इंटरनेट वापरा विषयीचे धडे देत विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंढेगाव ता. इगतपुरी येथे इयत्ता पहिली ते चौथी आणि अनुदानित आश्रम शाळा वाघेरा ता. त्रंबक येथे इयत्ता पाचवी ते सातवीला शिकवणा-या शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात जीमेल आयडी तयार करणे, मेल पाठविणे, मेल ला उत्तर देणे, गुगल ड्राइवर फोल्डर तयार करणे, ड्रायव्हर फोटो ,फाईल कसे अपलोड करायचे, फोल्डर मेलच्या माध्यमातून आणि लिंकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सहज शेअर करता येईल आधीचे प्रशिक्षण देण्यात आले. तर शेवटच्या सत्रात माझे *शैक्षणिक प्रयोग* यामध्ये शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रशिक्षणाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री .भोई सर यांनी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मुंढेगाव आश्रमशाळेत मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री. भांगरे सर श्री. कापडणीस सर, श्री भोये सर , श्री चंदनशिवे सर ,श्री . गायकवाड सर यांनीही पूर्णवेळ उपस्थिती दर्शवून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले .मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे विषयमित्र श्रीमती .दिपाली आहेर आणि श्रीमती .ज्योती पाटील यांनी चार दिवसीय प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षकांना सविस्तर असे मार्गदर्शन करून इंटरनेटचे धडे दिले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंढेगाव येथील मुख्याध्यापक श्री. तनवीर जहागीरदार सर आणि वाघेरा येथील अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक श्री .पवार सर आणि श्री .चौधरी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने