(प्रतिनिधी - दिनेश पगारे) सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव
येथील मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उतसाहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री बी.जे बच्छाव,पर्यवेक्षिका श्रीम.एम.बी. सोनवणे व सर्व शिक्षकांनी कविवर्य वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पी. आर.गांगुर्डे कार्यक्रमाचेअध्यक्ष होते.
याप्रसंगी मराठी भाषेचे औचित्य साधून मराठी भाषेतील गोडवा अप्रतिम आहे तो गोडवा सर्वांनी जपावा असे विचार कुमारी येता खुशाल चव्हाण,प्रियंका अविनाश अहिरे,नंदिनी सोमनाथ परदेशी,दुर्गा हरी जाधव,नम्रता भास्कर चव्हाण, आदिती नितीन खरे,मिताली अतुल शेवाळे,निकीता विजय चव्हाण कुमार विवेक संदिप अहिरे,आदित्य मनिष सिंग परदेशी यांनी व्यक्त केले. कुमारी आर्या नितीन अहिरे,भूमिका भाउसाहेब चव्हाण या विद्यार्थीनींनी मराठी गितांवर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व आपल्या गीतांच्या माध्यमातून पटवून दिले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुषगुच्छ देऊन सन्मान केला .
मराठी भाषा दिन म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी,लेखक नाटककार, साहित्यकार,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण कौशल्य आणि शब्द सामर्थ्यांच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली असे प्रतिपादन मराठी विषयाचे गाढे अभ्यासक श्री के.के.देवरे यांनी केले.
कविवर्य कुसुमाग्रज यांनी अनेक कथा,पटकथा,नाटक,कविता, कादंबऱ्या इत्यादिंचे कुशल लेखन करून मराठी भाषेला महत्व प्राप्त करून दिले.त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर झाले.तसेच विशाखा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे. त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो उसे प्रतिपादन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम.एम.बी.सोनवणे यांनी केले.
मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे. या भाषेला संत नामदेव,संत तुकाराम, संत झानेश्वर असे अनेक संतांनी जीवंत ठेवले आहे.तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभा संपन्न लखनीने समृद्ध झालेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले आहे.यापुढे ही मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण करायचे असेल तर आजच्या पिढीने ही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यावी.मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अजरामर बनवूया असे उद्गार विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री बी.जे.बच्छाव यांनी काढले.व मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दुर्गा हरी जाधव व नंदिनी सोमनाथ परदेशी यांनी केले. कुमारी निकीता विजय चव्हाण व कोमल केशव हिरे यांनी आभार प्रदर्शन केले.